वळसे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 2 लाख रुपये शिष्यवृत्ती
1 min read
निमगाव सावा दि.२०:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा, (ता. जुन्नर) या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यापीठाची २ लाख १० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाची शिष्यवृत्ती दिली जाते.
क्रांतीज्योती सावित्री माता फुले अर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून दहा मुलींसाठी पाच हजार रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसाह्य योजना 20 विद्यार्थ्यांसाठी तीन हजार रुपये प्रमाणे, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी सहाय्य योजना सहा ते दहा हजार रुपये अशा स्वरूपाची शिष्यवृत्ती दिली जाते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 22- 23 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजनेतून गरीब होतकरू दहा विद्यार्थिनींना 50 हजार रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसाह्य योजनेतून 20 विद्यार्थ्यांना सात हजार रुपये, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून सहा विद्यार्थ्यांना 48 हजार रुपये आणि महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी सहाय्य योजनेतून आठ विद्यार्थ्यांना 52 हजार रुपये अशी एकूण दोन लाख दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
याबद्दल संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, अध्यक्ष संदिप पवार, सचिव परेश घोडे, संस्थेच्या प्रतिनिधी कविता पवार, संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव आणि सर्व शिक्षकांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन चांगले गुण मिळवून विविध शिष्यवृत्ती मिळवाव्यात असे आवाहन संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांस केले.