श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुलने जपले हिंदू – मुस्लिम ऐक्य

1 min read

शिक्रापूर दि.२०:- श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुल शिक्रापूर येथे रमजान महिन्याचे औचित्य साधून शाळेमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. इफ्तार पार्टीचे आयोजन करणारी बहुधा ही पुण्यातील पहिलीच शाळा असावी. या शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव मुलांना करून देण्यात येते.

सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, अखंडता मुलांना समजावी यासाठी स्कूलमध्ये वेळोवेळी सर्व सण साजरी केले जातात. इफ्तार पार्टीमुळे हिंदू मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन यावेळी घडले. श्री सिद्धिविनायक स्कूल मार्फत संस्थेचे सर्वेसर्वा सोमनाथ तात्या सायकर यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना एकत्र आणण्याचे काम केले.

या कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या चेअरमन मनिषा सायकर, संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ तात्या सायकर, विश्वस्त बाबुराव साकोरे ,विश्वस्त प्रांजल गायकवाड ,विश्वस्त अक्षय गायकवाड शाळेचे प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्य उज्वला दौंडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधव पालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली. वेळेप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी विविध प्रकारच्या फळांचे, ड्रायफ्रूट्स, तसेच स्नॅक्स कोल्ड्रिंक्स आदिचे आयोजन करण्यात आले होते.

इफ्तार पार्टी नंतर पालक प्रतिनिधींमधून फिरोज हवालदार यांनी रमजान चे महत्व सर्वांना समजावून सांगितले. शाळेने इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यानंतर साकोरे सर आणि शाळेचे प्राचार्य गौरव खुटाळ यांनी मुस्लिम बांधवांना रमजान साठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक, सर्वजण उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे