समर्थ शैक्षणिक संकुलात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

1 min read

बेल्हे दि.१६:- समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे (ता.जुन्नर) या अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्रा.राजीव सावंत,डॉ.शिरीष गवळी,

डॉ.महेश भास्कर, बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,लॉ कॉलेज चे प्राचार्य विजय पानमंद, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा. दिनेश जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस १४ एप्रिल भारतासह जगभरातल्या अनेक देशात साजरा केला जातो. या दिवसाला‘समता दिन’आणि‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो.कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘समतेचे प्रतिक’ आणि ‘ज्ञानाचे प्रतिक’ सुद्धा म्हटले जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा

जन्मदिवस‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रमांनी जागतिक स्तरावर साजरी केली जाते असे उद्गार प्रा.राजीव सावंत यांनी काढले. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी अखंडपणे ज्ञान अवगत करतांना सातत्यपूर्ण परिश्रम,जिद्द आणि चिकाटी मनात ठेवून आपले इप्सित ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा असे डॉ. संतोष घुले यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे