पुणे टॅलेंट सर्च परीक्षा बक्षीस वितरण कार्यक्रम वडगाव आनंद येथे संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१६:- पुणे जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे टॅलेंट सर्च या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद येथे संपन्न झाला. असल्याची माहिती जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी स्पर्धा परीक्षांचे तंत्र आणि मंत्र या विषयावर बोलताना प्राध्यापक मुसळे म्हणाले की स्पर्धा परीक्षांमध्ये जर यश संपादन करायचे असेल तर सातत्य व वेळेचे नियोजन आवश्यक आहे जेईई,नीट, एनडीए, सीईटी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे शंका समाधान करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली स्पर्धा परीक्षे बाबतची भीती दूर करण्याचे काम प्रा. मुसळे यांनी केले तसेच निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबतचे मार्गदर्शन भगवान पांडेकर यांनी केले तसेच जिल्हा समन्वयक देविदास शिंदे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तबाजी वागदरे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास देवकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष कल्याण बर्डे, पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे समन्वयक देविदास शिंदे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ताबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, उपाध्यक्ष वाय बी दाते, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, टी आर वामन, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे तालुका अध्यक्ष सतीश निमसे, मुख्याध्यापिका रंजनी डुंबरे, पुरंदर तालुका गणित अध्यापक संघाचे जिल्हा समन्वयक सचिन धनवट, हवेली तालुका गणित अध्यापक संघाचे जिल्हा समन्वयक संदीप लोणकर, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, सचिव प्रशांत शेटे, उपाध्यक्ष बाळासाहेब कवडे, सहसचिव संजय कुटे, प्रकाश जोंधळे , कार्याध्यक्ष तुषार आहेर, खजिनदार व्यंकट मुंढे,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे टॅलेंट सर्च परीक्षेसाठी जुन्नर तालुक्यातील 1556 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील 60 गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रशस्तीपत्रक व कविता मूलद्रव्यांची हे वैज्ञानिक पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे शाश्वत फार्मिंग फाऊंडेशन प्रकाशित परसबाग आणि उपयुक्त सुक्ष्मजीव ही पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे