श्री. जे.आर. गुंजाळ इंग्लिश स्कूल मध्ये २४ ते २९ एप्रिल दरम्यान जिजाऊ उन्हाळी संस्कार शिबिर
1 min read
आळेफाटा दि.१५:- श्री. जे.आर. गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळेफाटा (ता.जुन्नर) येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी २४ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जिजाऊ उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य यांनी दिली.
या शिबिरामध्ये दुसरी ते नववी (वयोगट आठ ते पंधरा) वर्षाची मुले- मुली सहभाग घेऊ शकतात. तर यासाठी केवळ ३०० रुपये प्रवेश फी असून शिबिरासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेण्यासाठी 9763299097, 02132-299097 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.शिबिराची वेळ सकाळी ८:३० ते ११ वाजेपर्यंत असेल.
या शिबिरात अभ्यास,नृत्य, नाट्य, कला अभिनय, भाषण कौशल्य, देहबोली, निसर्ग परिचय, रंगकाम, पथनाट्य, योगा ध्यानधारणा, सामाजिक विकास, तणाव मुक्ती, सुजाण व परिपूर्ण नागरिक आणि बरच काही शिकवलं जाणार आहे.