हद्दपार आरोपी शिर्डीतून जेरबंद; सापळा रचून आरोपी ताब्यात

अहिल्यानगर दि.१४: जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक विलास वाघमारे (रा.सावळीविहीर, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिर्डी उपविभागीय अधिकारी यांनी जिल्ह्यातून हद्दपार केलेला आरोपी राहाता तालुक्यातील सावळीविहीर या परिसरात वावरत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव व महादेव भांड यांच्या पथकाने केली.