नारायणगावात मारुती सुझुकी शोरूममध्ये चोरी; तिजोरी फोडून चोरट्यांनी सव्वापाच लाखांची रोकड लंपास

1 min read

नारायणगाव दि.१४:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील मारुती सुझुकी शोरूममधील तिजोरी फोडून चोरट्यांनी सव्वापाच लाखांची रक्कम चोरून नेली.

पुणे नाशिक महामार्गावर ती हायवे लगत असणाऱ्याया शोरूम मध्ये चोरी झाली आहे. ही घटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून सुरक्षारक्षक साखरझोपेत असताना. चोरट्यांनी शोरुममध्ये प्रवेश केला व गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून तिजोरी फोडून त्यामधील ५ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम हातोहात पळविली.

ही घटना गुरुवारी (दि.१३) पहाटे २ ते ३ च्या सुमारास घडली.याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. चोरट्यांनी खिडकीतून शोरूममध्ये प्रवेश केला.

शोरूममधील तिजोरी शोरूमच्या पहिल्या मजल्यावर नेली. त्यानंतर गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून तिजोरीचा पत्रा कापला. तिजोरीतील ५ लाख १२ हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून दोन चोरटे आतमध्ये व इतर चोरटे बाहेरच्या बाजूने असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीची फिर्याद कर्मचारी अभिजित भालेराव यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू केला असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले. या ठिकाणी दोन सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरटे आतमध्ये येतात व चोरी करून जातात, याचा तपास सुरक्षारक्षकांना लागत नाही.

त्यामुळे या चोरीमध्ये स्थानिकांचा काही हात आहे का याबाबत देखील संशय वाढला असून तसा तपास केला जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, दत्ता ठोंबरे, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे