वाहनांचे डिझेल चोरी करणारी परराज्यातील टोळीला आळेफाटा पोलीसांनी केली जेरबंद

1 min read

आळेफाटा दि.१२:- राष्ट्रीय महामार्गवर उभे असणाऱ्या वाहनांचे डिझेल चोरी करणारी परराज्यातील टोळीला आळेफाटा पोलीसांनी केले जेरबंद करत पंधरा लाख पंचवीस हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील पोलिस ठाण्यात राजेशकुमार चुनीलाल परमार (वय ४८ वर्षे रा. जम्मू काश्मिर) यांनी आर.जे. ३२ जी.डी २२१४ हा ट्रक आळे ता. जुन्नर जि.पुणे गावचे हद्दीत पुणे- नाशिक हायवे रोडवरील महालक्ष्मी फर्निचर समोर उभा करून गाडीमध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी नमुद गाडीचे डिझेल टाकीचे झाकण कशाने तरी उचकटून त्यामधून २०० लीटर डिझेल चोरून नेलेबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या टिमल गोपनिय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की, अशाप्रकारे डिझेल चोरी करणारे आरोपी एम.एच.४१ जी. ७५२३ या ट्रक मधून डिझेल चोरी करण्यासाठी पुणे नाशिक हायवे रोडने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, तात्काळ आळेफाटा चौक येथे नाकाबंदी नेमून सदरचा ट्रक आल्यानंतर ट्रक मधील १) राजाराम कनिराम परमार वय ४८ वर्षे रा. गड्रोली ता.जि. साजापुर राज्य मध्यप्रदेश, २) फिरोज अजिज खान वय २८ वर्षे. रा. गडोली ता. जि. साजापुर राज्य मध्यप्रदेश, ३) ओमप्रकाश राधेशाम बैरागी वय ४४ वर्षे रा. सेमलिया ता. कालापिपल जि. साजापुर राज्य मध्यप्रदेश, ४) कल्लू खॉ रूस्तम खाँ मंन्सुरी वय ३८ वर्षे रा. गड्रोली ता.जि. साजापुर राज्य मध्यप्रदेश व ५) विनोद नारायण सिंग वय २८ वर्षे रा. गड्रोली ता. जि. साजापुर राज्य मध्यप्रदेश यांना ट्रकसह ताब्यात घेवून त्यांच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, ते त्यांचा टोळी प्रमुख याच्या सांगण्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या मालवाहतुक ट्रकमधिल डिझेल चोरी करीत असल्याची कबुली दिली असून त्यांना नमुद गुन्हयाचे तपासाकामी अटक करण्यात आली आहे. तसेच या पाच आरोपींकडुन त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला ट्रक व चोरून नेलेले डिझेल विकी करून आलेले पैसे असा एकुण १५,२५,५००/- (पंधरा लाख पंचवीस हजार पाचशे रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा सुनिल गिरी, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, प्रल्हाद आव्हाड, पो.कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, दिपक नागरे, प्रविण अल्हाट, कांचन रानडे, विशाल पालवे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे