जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची नळवणे येथे भंडारा- खोबरेने तुला

1 min read

आणे दि.१२:- मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्यातून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांची श्रीक्षेत्र नळवणे येथे ग्रामस्थांच्या वतीने भंडारा खोबऱ्याने तुला करून सत्कार करण्यात आला.

नळवणे गावाने झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शरद सोनवणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले होते. नळवणे येथे श्री कुलस्वामी खंडेराया मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमदार सोनवणे नळवणे गावात आले होते. शरद सोनवणे आमदार पदी निवडून आल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या वजना एवढे भंडार खोबऱ्याने तुला करून सदा आनंदाचा येळकोट करत उधळण केली.

यावेळी नळवणे गावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली. या प्रसंगी राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे, रंगनाथ आहेर, नळवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते हौशिराम शिंदे, नवनाथ गगे,

माजी सरपंच तुषार देशमुख, संतोष शिंदे, सागर देशमुख नितीन शिंदे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे