सोलापूरात देवदर्शनाला निघालेल्या मिनी बसला कंटेनरची धडक; तीन ठार; १५ जखमी

1 min read

सोलापूर दि.१०:- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आज सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. काही भाविक हे मिनीबस मधून देवदर्शनासाठी जात असतांना, समोरून येणाऱ्या भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने आधी दुचाकीला व नंतर मिनी बसला धडक दिली. या घटनेत तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत.मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला. या अपघातानंतर घटनास्थळी जखमींचा मोठा आक्रोश झाला होता. तसेच वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेत दुचाकी चालक दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरने आधी दुचाकीला धडक दिली. यानंतर हा कंटेनर विरुद्ध बाजूने जात समोरून येणाऱ्या मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस पलटी झाली. या घटनेत मिनीबस मधील तिघे जण जागीच ठार झाले तर १५ प्रवासी हे गंभीर जखमी झाले.या अपघातानंतर घटनास्थळी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस देखील घटनास्थळी आले. मिळेत त्या वाहनाने जखमी नागरिकांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात देखील डॉक्टरांनी धावपळ झाली. मिनी बसमधील जखमी प्रवासी आजुबाजूला बसून तर काही जण जमिनीवर झोपून व्हिवळत होते. काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. डॉक्टरांनी दवाखान्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जखमी अथवा मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समजू शकली नाही. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर व तुळजापूरला देवीच्या दर्शनाला जात होते. या बसमध्ये १५ पेक्षा जास्त भाविक होते. त्यांची बस ही कोळेवाडी येथे आली असताना हा भीषण अपघात झाला. यात तिघा भाविकांवर काळाने घाला घातला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे