सौरव गांगुलीच्या कारचा भीषण अपघात; बालंबाल बचावला गांगुली
1 min read
कोलकत्ता दि.२१:- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात सौरव थोडक्यात बचावला. मिळालेल्या माहितीनुसार दंतनपूरजवळ गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक एक ट्रक आल्यामुळे, गांगुलीच्या कार चालकाला ब्रेक लावावे लागले आणि यामुळे मागून येणारी अनेक वाहने एकमेकांवर आदळली.सौरव गांगुली एका कार्यक्रमात जाण्यासाठी बर्दावानकडे निघाला होता.
त्यावेळी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर एक ट्रक त्यांच्या कारच्या समोर आली. त्यामुळे चालकाचे संतुलन बिघडले. पण चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावले. मागील कारनेही ब्रेक लागवले, त्यामुळे सर्व कर एकमेंकाना जोरदार धडकल्या. या भीषण अपघातामध्ये कारचे मोठं नुकसान झालं.
या भीषण अपघातात सौरव गांगुलीच्या सोबत असणाऱ्या एकाही व्यक्तीला दुखपत झाली नाही. पण अपघातानंतर सौरव गांगुलाला दहा ते १५ मिनिटे थांबावे लागले. सौरव गांगुलीच्या ताफ्यामधील दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. दुर्घटना झाली, त्या ठिकाणी थोडावेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. दहा ते १५ मिनिटांनंतर सौरव गांगुली बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमासाठी निघून गेला. या अपघातात सौरव गांगुलीच्या कारला ट्रॉलीची पुढून तर अनेक कारची पाठीमागून धडक बसली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, हीच एक दिलासदायक बाब आहे. मात्र, एकमेकांवर आदळल्याने या ताफ्यातील वाहनांचे झाले आहे. अपघातानंतर सौरभ गांगुली सुमारे 10 मिनिटे रस्त्यावरच होता. मात्र, त्यानंतर तो वर्धमान विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुढे निघाला. या अपघातात गांगुली थोडक्यात बचावला असून मोठा अनर्थ टळला आहे.