पोखरी गावात एसटी सुरू नसल्याने विद्यार्थी, नागरिकांचे प्रचंड हाल; आंदोलन करण्याचा दिला इशारा
1 min read
पोखरी दि.१६ :- नारायणगाव डेपोची एसटी बस कोरोना पासून बंद असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी २० किलोमिटर पायपीट व सायकल वारी सुरू आहे. आणे पठार भागातील पोखरी (ता.पारनेर) गावातील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण घेण्यासाठी शेजारील आणे व इतर ठिकाणी शाळेत जाण्यासाठी दररोज २० किलोमीटरची पायपीट व सायकल चा प्रवास करावा लागत आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही एसटी बस सुरू नसल्यामुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येत नाही तसेच बस नसल्याने गावात नातेवाईक, पाहुणे मंडळी येण्याचे प्रमाण सुद्धा प्रमाण कमी झाले आहे. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून माध्यमिक शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी दररोज आने व इतर ठिकाणी जात आहेत.
नारायणगाव व पारनेर आगाराची तसेच परिवहन महामंडळाची एकही बस सध्या या गावात जात नाही. ऊन वारा पाऊस या सर्व संकटांचा सामना करत दररोज २० किलोमीटरची पायपीट किंवा मिळेल त्या गाडीला हात करून जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात फरक पडत आहेत.
त्यामुळे बऱ्याचशा पालकांनी आपल्या पाल्यांना शहरातील नातेवाईक किंवा बोर्डिंग मध्ये पाठविले आहे. शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध करावी. अशी मागणी सरपंच हिरा जालिंदर पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक खैरे, अण्णासाहेब खैरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार पाटील आणि ग्रामस्थ पोखरी यांनी केली आहे. “नारायणगाव बस डेपोला याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून बस सुरू करण्यात बाबत अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नाही.”
“हिरा पवार, सरपंच पोखरी
———–
नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते व सरपंच हिराबाई पवार पोखरी तसेच बाळासाहेब शिंदे पोखरी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक खैरे, खादी ग्राम महामंडळाचे सदस्य अण्णासाहेब खैरे तसेच योगेश आंबेकर, पळसपूरचे सरपंच श्रीकांत वाघमारे, म्हसोबाझाप सरपंच प्रकाश गाजरे,
कटारेवेढे सरपंच पीयूष गाजरे आणे गाव सरपंच प्रियंका दाते व सदस्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील गाडी चालू केली नाही. पोखरी आणि पोखरी शेजारी दहा-पंधरा गावांचे विद्यार्थी रोज आळे या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जात असून त्यांची जाणवण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे जर यांनी गाडी चालू केली नाही. तर शेवटी सगळे परिस्थिती लोक रास्ता रोको करून जाहीर आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तसेच नारायणगाव डेपो साठी या परिसरातील ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणतीही दखल घेतलेली नाही आणि नेहमी उडवा उडवी चे उत्तर देत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आता यांनी वाहतूक नियंत्रण कक्ष उपाय आयुक्तालय पुणे विभागाशी ग्रामस्थांनी संपर्क केला असता त्यांनी तुमची गाडी लवकरात लवकर चालू करा असे आश्वासन दिलेले आहे. यांनी आता त्वरित गाडी चालू करावी अशी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जर गाडी चालू झाली नाही तर सदर ग्रामस्थ उपोषण स्थळी पुणे- नाशिक हायवे या ठिकाणी आंदोलन करणार आहे. याची डेपो महामंडळाने दखल घ्यावी नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांनी देखील पाठपुरावा केला आहे. नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे.
तरी माजी उपसरपंच परसराम शेलार, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पवार तसेच शिवम पवार विद्यमान सदस्य सिताराम केदार, तसेच पळसवर गावचे कार्यकर्ते रवी आहेर यांनी विद्यमान आमदार काशिनाथ दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
महामंडळ या ठिकाणची गाडी चालू करीत नाही याची सखोल चौकशी करून गाडी चालू व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पोखरी या गावचा श्री रंगदास स्वामी महाराज यांचा सप्ताह साजरा होत असून भाविकांची मोठी वरदळ यात्रेसाठी होत असते तरीही त्यांनी लवकरात लवकर एसटी बस चालू करावी अशी ग्रामस्थांमधून जोर होत आहे कारण येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी पोखरी या गावी जाण्यासाठी एकही बस नाही.