पेमदरा येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी
1 min read
Oplus_131072
पेमदरा दि.८:- यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ग्रामपंचायत पेमदरा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला आसल्याची माहिती गावच्या सरपंच जयश्री पाटील गाडेकर व उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी दिली.
या वेळी ECG, BP, Sugar हृदयरोग, स्त्रीरोग आजार व सर्व आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन महिलांना करण्यात आले. शिबीरात स्त्रीरोग चिकीत्सा, स्त्रीरोग प्रसूती, यांसह अनेक आजारांवर शेकडो महिलांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.
या वर्षी प्रथमच या वर्षी ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवल्याबद्दल गावातील महिलांनी ग्रामपंचायतचे आभार मानले. या वेळी मनीषा डावखर (सरपंच बेल्हे), कमल गजानन घोडे (ग्रा.पं सदस्य बेल्हे), पल्लवी स्वप्निल भंडारी (ग्रा.पं व सदस्य बेल्हे), रेश्मा बोटकर (सरपंच पारगाव), तारा लामखडे (सरपंच मंगरूळ), गोपाळे मॅडम/खोसे मॅडम, मिनाक्षी सेंडकर (ग्रामसेवक पेमदरा),
डॉ. अविनाश जोशी (वाय सी एम हॉस्पिटल जुन्नर व टीम), जयश्री गाडेकर (सरपंच पेमदरा), बाळासाहेब दाते (उपसरपंच पेमदरा), जानकु डावखर (अध्यक्ष मुक्ताई देवस्थान ट्रस्ट बेल्हे), पोपट गुंजाळ (दक्षता कमिटी), उपस्थित होते.
सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व टीम यांचे लाभले.