हळदी- कुंक कार्यक्रमात सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र; मुस्लिम व विधवा महिलांचा सन्मान
1 min read
निमगाव सावा दि.५:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे हिंदू, मुस्लिम व विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमातुन विविधतेतून एकता, सर्व धर्म समभाव साधला गेला.कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील निवेदिता डावखर यांनी महिलांना व्यवसाया बद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. महिलांनी व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, त्यासाठी लागणारे पूर्वतयारी, वित्तपुरवठा, बाजारपेठ, कच्चामाल, साधनसामग्री, मजूर, आधुनिक तंत्रज्ञान, शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान यासंबंधी सर्व माहिती महिलांना दिली.
तसेच आपल्या मधूनच आणि या ग्रामीण भागातील महिला जर उद्योजक बनल्या तर खऱ्या अर्थाने आपल्या गावाबरोबरच आपला देश सुद्धा स्वयंपूर्ण होईल. त्यासाठी महिलांनी उद्योजकतेमध्ये प्राविण्य मिळविणे, ही काळाची गरज असल्याची त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत, महिला बचत गट व दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे, महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापके तर कर्मचारी आणि कविता संदीपान पवार व त्यांच्या बचत गटातील सर्व सहकारी भगिनी यांच्या नियोजनातून उत्कृष्ट रीतीने पार पडला.