आळे येथे विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ
1 min read
आळेफाटा दि.२९:- आळे या ठिकाणी वैभव महालक्ष्मी बचत गटाच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी- कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या बाबत सविस्तर माहिती अशी की, आळे (ता.जुन्नर) येथील गव्हाळी मळ्यातील गलांडे वस्तीवरील वैभव महालक्ष्मी महिला बचत गटाच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास ६० विधवा महिलांणी सहभाग घेतला. या सर्व विधवा महिलांना निमंत्रित करून त्यांची ओटी भरून हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सुमन भुजबळ, आरती भुजबळ सविता गाजरे या महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन रेश्मा गलांडे, सोनाली गलांडे, सीमा गलांडे, सविता भुजबळ, हौसाबाई दरेकर, ज्योती कु-हाडे, जयश्री कु-हाडे, पुष्पावती कालेकर, अपर्णा शिंदे, प्राजक्ता कु-हाडे, संगिता फावडे या महिलांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सीमा गलांडे व सविता हाडवळे यांनी केले तर प्रास्ताविक रेश्मा गलांडे यांनी केले व आभार सिमा गलांडे यांनी मानले.
प्रतिक्रिया
‘आजही काही वाडया – वस्तीवर विधवा महिलांणा दुर्लक्षित केले जात असल्याने या महिलांचा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी व जुन्या रूढी व परंपरा बंद व्हाव्यात, सार्वजनिक ठिकाणी व लग्न समारंभासह इतर समारंभात त्यांना इतर महिलांप्रमाणे मानसन्मान व वागणूक मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.’
शिल्पा कणसे