रानमळा येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराची सांगता

1 min read

रानमळा दि.२६:- गेले सात दिवस श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. रानमळा (ता. जुन्नर) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिबिराच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संदिपान पवार हे होते.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव चे प्राध्यापक डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आम्ही सुद्धा याच माध्यमातून घडवून समाजाची सेवा करत आहोत. तुमचेही भविष्य उज्वल आहे. राष्ट्रीय सेवा योजना आपणास मेहनत, कष्ट करण्यास शिकविते, समाजामध्ये वागण्यास शिकविते आणि जगण्यासही शिकवते. राष्ट्रीय सेवा योजना ही तरुण युवकांना संस्कारक्षम बनवते. या श्रमसंस्कार शिबिरात घडलेला विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो याची अनेक उदाहरणे आहेत. गेली 25 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे काम करत असताना त्यातून मला माझ्यासाठी जे हवे ते मिळाले त्यामुळे विद्यार्थी मित्रहो तुम्ही सुद्धा यशस्वी होऊन उद्याचा उज्वल भारत घडविणार! हेच या शिबिराचे यश असल्याने हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.शिबिर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत आणि स्मशानभूमी परिसर स्वच्छता, वृक्षारोपण करून आम्हा ग्रामस्थांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच आमच्या गावच्या ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले असे चिरस्थायी, टिकाऊ, मौलिक कार्य केल्याचे माजी सरपंच सुरेश तिकोणे यांनी व्यक्त केले.साईकृपा पतसंस्थेचे संचालक सावकार पिंगट यांनी शिबिर काळात विद्यार्थ्यांनी केलेली ग्राम स्वच्छता, लोकसंख्या सर्वेक्षण, स्मशानभूमी काम याचे कौतुक केले. याप्रसंगी नारायणगाव महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. अनिल काळे, आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, आदर्श शिक्षक दत्तात्रय घोडे, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक साईनाथ कोयमहाले, साक्षी गुंजाळ, ओंमकार खणकर, अश्विनी पानसरे, गौतमी गाडगे इत्यादींनी मनोगते व्यक्त केलीसंस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार आणि प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील वर्षी आपल्याच गावात शिबिराचे आयोजन करून स्वयंसेवक अधिक चांगले काम करतील अशी ग्वाही दिली.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, प्रमुख पाहुणे डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ.अनिल काळे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, रानमळा सरपंच सविता तीकोणे, माजी सरपंच सुरेश तीकोने, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, मंगरूळच्या सरपंच तारा लामखडे, सावकार पिंगट, श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल चे मुख्याध्यापक सुदाम जगताप, दत्ता घोडे सर,ग्रामपंचायत सदस्य श्वेता गुंजाळ, इंदुबाई गुंजाळ, संतोष गुंजाळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दादाभाऊ गुंजाळ, अशोक गुंजाळ, विलास गुंजाळ, कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड, सह कार्यक्रमाधिकारी प्रवीण गोरडे, प्रा.अजय ननवरे, प्रा.विजय काळे, माजी विद्यार्थी मयूर डुकरे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि रा. से. यो. स्वयंसेवक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ यांनी रा.से. यो. स्वयंसेवकांनी सात दिवसांमध्ये केलेल्या सर्व उपक्रम, श्रमदान, मार्गदर्शनपर व्याख्याने यांची माहिती दिली. तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आणि सर्व ग्रामस्थांचे गेल्या आठ दिवसांमध्ये दिलेल्या स्नेहाबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीलम गायकवाड आणि रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी शिबिर कालावधीमध्ये रानमळा गावच्या सरपंच सविता तिकोणे आणि सुरेश तिकोणे तसेच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी व ग्रामस्थ यांनी केलेल्या सहकार्य आणि दिलेल्या स्नेह,आपुलकीबद्दल ऋण व्यक्त करून कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे