ऊसतोड महिलांचा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम

1 min read

आळे दि.८:- लवणवाडी (ता.जुन्नर) येथील महिला शेतकरी मंदा बापू कुऱ्हाडे व मंदा गोविंद कुऱ्हाडे यांच्याकडे 9 एकर ऊस तोडणी करण्यासाठी भाटेपाडा ता.सटाणा जि.नाशिक येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडे आलेले ऊसतोड यांनी 35 दिवस ऊसाची तोडणी केली. शेवटच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. सायंकाळी आपल्या झोपड्यांकडे जाण्याच्या वेळी ऊसतोड महिलांना साडी चोळी, डब्बा, साखर, हळदी कुंकू, तिळगुळ वरील हळदी कुंकवाचा वाण देऊन सन्मानित करण्यात आले. ऊसतोड महिलांमध्ये भोरीबाई सोनावणे, गंगुबाई पवार, सोनीबाई सोनावणे, भारती सोनावणे, मीना सोनावणे, मंजू सोनावणे, लता सोनावणे, शानू‌ पवार, लताबाई माळी, राधाबाई पवार, प्रमिला देशमुख उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे आयोजन‌ मंदा कुऱ्हाडे, नंदा कुऱ्हाडे, राधाबाई कुऱ्हाडे, रेश्मा कुऱ्हाडे व भावना कुऱ्हाडे यांनी केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे