आणे येथे पशुपालक मेळाव्याचे आयोजन

1 min read

आणे दि.९:- आणे (ता.जुन्नर) येथे दुग्ध व्यवसायिक व पशुपालकांसाठी पशुधन मार्गदर्शन व मोफत कार्य मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आणे येथील बहुजन विकास विचार मंचच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी शिबिराचे उद्घाटन केले. आहेर वस्तीवरील येमाई देवीच्या मंदिरात झालेल्या या शिबिरात पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष राहणे यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. डॉ. किसन कांबळे, डॉ. आनंद कांबळे, डॉ. सुमित गाडगे, डॉ. रोहन दाते, डॉ. प्रणव आंद्रे व डॉ. अजिंक्य दाते यांनी प्रत्यक्ष गोठ्यावर जाऊन पशू तपासणी केली. यावेळी हायटेक गोचीड इंजेक्शन, कॅल्शिअम पावडर, फॉस्फरस इंजेक्शन, जंताच्या गोळ्या ई. औषधे मोफत देण्यात आली. या मार्गदर्शन शिबिरात बाळासाहेब दाते, डॉ. दीपक आहेर, विनायक आहेर, अनंथा आहेर, गोविंद आहेर आदी मान्यवर तसेच बहुजन विकास मंचचे अध्यक्ष अतुल गोफने, उपाध्यक्ष भरत पंदारे, सचिव संदेश बाबेल, संचालक जावेद अतार, संतोष थोरात उपस्थित होते. पंचक्रोशीतील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन विकास मंचचे संस्थापक अरविंद पंडित यांनी सूत्रसंचालन केले व पशुधन विकास अधिकारी डॉ विष्णू आंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे