मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मोठी दुर्घटना ८ सदस्यांचा मृत्यू ; ४५० ते ५०० जणांवर उपचार सुरू ; भर उन्हात ठेवला कार्यक्रम

मुंबई दि.१६: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात सुमारे ४५० ते ५०० श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला असून सात ते आठ सदस्यांचा मृत्यू झाला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात दाखल झाले आहे.
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम भर उन्हात झाल्याने धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले आहेत.हवे ते उपचार श्री सेवकांना मिळावेत, गरज पडली तर विशेष वॉर्ड तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम प्रशासनाला दिले आहे.आज तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेला होता. उघड्या मैदानात महाराष्ट्र भूषण कार्यक्रम संपन्न झाल्याने अनेकांना उन्हाचा त्रास झाला. मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री श्री सेवकांची चौकशी करण्यासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल झाले.

” उन्हाच्या वेळी कार्यक्रम ठेवला होता, लोकांना उष्माघात होणारच. कदाचित अमित शहांकडे तीच वेळ असावी. सहसा हा कार्यक्रम छोटेखानी असतो, राजभवनात वगैरे असतो मात्र शिंदे फडणवीसांना प्रत्येक कार्यक्रमातून सवंग प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यांचं समजू शकतो पण अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी तरी हे अनावश्यक आहे हे सांगायला पाहिजे होतं. अध्यात्मिक गुरूला या शक्ती प्रदर्शनाची गरज खरोखर का भासावी?”

विशंभर चौधरी
सामाजिक कार्यकर्ते

“दुर्दैवी दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांना च्या कुटुंबियाना ५ लाख रुपये मदत व उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांचा उपचाराचा खर्च शासन करणार आहे.”

एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे