‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात दावडी विद्यालयाचा खेड तालुक्यात दुसरा क्रमांक

1 min read

खेड दि.५:- महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 उपक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दावडी या प्रशालेचा खाजगी शाळा गटामध्ये खेड तालुक्यात द्वितीय क्रमांक आला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य दादाभाऊ फापाळे यांनी दिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन उपक्रमाची तपासणी पंचायत समिती खेड शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आली विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यालय तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावत दोन लाख रुपयाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. विद्यालयाच्या यशाबद्दल स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तुकाराम गाडगे पाटील, रयत पश्चिम विभाग सल्लागार समिती सदस्य सुरेश डुंबरे, स्कूल कमिटी सदस्य वैशाली गव्हाणे , सरपंच पुष्पा होरे, उपसरपंच धनश्री कान्हूरकर, माजी सरपंच संभाजी घारे ,माजी उपसरपंच अनिल नेटके , संतोष सातपुते, रमेश होरे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे