साईसंस्कार क्लासेसच्या इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात

1 min read

बेल्हे दि.४:- साईसंस्कार शैक्षणिक संकुल (बेल्हे शाखा ता.जुन्नर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आम्हाला क्लासमध्ये पूर्ण वर्षभर गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाचे उत्तम मार्गदर्शन भेटल्याचे सांगितले.

प्रत्येक सोमवारी होणाऱ्या परीक्षेमुळे आमच्या गुणांमध्ये व आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी नमूद केले.9 वी आणि 10 वी च्या वर्गाला गणित विषय शिकवणारे अमर डुकरे व विज्ञान विषय शिकवणाऱ्या अनुजा डुकरे यांनी वर्षभर केलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी धन्यवाद दिले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये कुणी जास्त हुशार किंवा कुणी कमी हुशार म्हणून असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समानतेने शिकवून शेवटच्या विद्यार्थ्याला देखील सर्व व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने शिकवल्याचे सांगितले व हा क्लास आणि यामधील सर्व शिक्षक आमच्या कायम स्मरणात राहतील असे नमूद केले.

साईसंस्कार शैक्षणिक संकुलाचे संस्थापक संचालक अमर डुकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत तुमचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले. भरपूर मेहनत करा व खूप मोठे व्हा असे सांगत भविष्यातील कोणत्याही अडचणी आल्यास मदत करण्याचे आश्वासन देऊन. 10 वी नंतर जर कुणी MHT – CET /JEE /NEET या परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी असतील तर बाहेर पुणे, मुंबई, लातूर, नांदेड यासारख्या शहरात जाऊन जास्त खर्च करण्याऐवजी आपल्याच संकुलात प्रवेश घेऊन त्याच पद्धतीने तयारी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी याच संकुलात MHT-CET ची बॅच कशा पद्धतीने चालते याचीही माहिती सरांनी दिली.

संकुलाच्या कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत कायम सर्व शिक्षकांच्या संपर्कात राहून सतत मार्गदर्शन घेण्याचे सांगितले तसेच संकुलाच्या डायरेक्टर अनुजा डुकरे यांनी सर्वांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे