पारगाव तर्फे मढ येथे रंगला नव चेतना ग्राम संघाचा हळदी कुंकू कार्यक्रम
1 min read
पारगाव तर्फे मढ दि.३:- येथे नव चेतना ग्राम संघाचे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला वर्ग यांनी कार्यक्रमाचा आनंद घेत अतिथी यांचे आभार मानले. या वेळी सरपंच दत्तात्रय पांडुरंग डेंगळे, उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. उपसरपंच पुष्पा विनायक चकवे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्रिया मोहन चकवे, हर्षदा दत्तात्रेय धेंगले तसेच महेंद्र बागड, अमित भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गेली ३ वर्षा पासून कार्यक्रम घेत असून २०० महिलांचा सहभाग कार्यक्रमासाठी होता.महिला सक्षमीकरण हे काम चालते माझी प्रत्येक ताई सक्षम करायची आहे.
हाच उद्देश मनात ठेऊन काम सुरू आहे वेगवेगळ्या योजनांची माहिती देणे, कर्ज प्रस्ताव तयार करून कर्ज मिळवून देणे, कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीने करून घेणे.स्वतः चे जीवन मान उंचावणे. हाच उद्देश मनात ठेऊन त्यावर उपाय योजना सुरु आहेत.असे मत लोककल्याण आधार मंच,पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिता शांताराम बागाड यांनी या वेळी व्यक्त केले.