आश्वासनानंतर आळेफाटा बसस्थानकावरील उपोषण सोडले

1 min read

आळेफाटा दि.३:- येथील बस स्थानकात दि. 30 जानेवारी पासून नवनाथ दादाभाऊ वाळुंज अन्नत्याग उपोषणासाठी बसले होते. तरी तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आळेफाटा बस स्थानकाची शासकीय मोजणी करून हद्द निश्चिती करून अतिक्रमणे काढले जातील.

व संपूर्ण बस स्थानकाला रक्षण भिंत उभारली जाईल सर्व प्रक्रिया 90 दिवसांच्या आत पूर्ण केली जाईल असे लेखी आश्वासन नारायणगाव आगार प्रमुख वसंत आरगडे यांचेकडून पाठविले असल्याने नवनाथ वाळुंज यांनी चालू असलेले उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित केलेले आहे. तरी याप्रसंगी ग्रामपंचायत जेष्ठ्ठ सदस्य वैशाली देवकर, निशा वाळुंज, संदीप गडगे, संतोष पादिर, वडगाव आनंद गावचे जेष्ठ नागरिक व माजी सरपंच रघुनाथ चौगुले, अविनाश चौगुले, राजू लोखंडे, वडगाव आनंद चे पोलीस पाटील दत्ता पाटील चौगुले, वडगाव आनंद वि.वि.का.सोसायटीचे संचालक निमेश वाळुंज, सचिन वाळुंज, गणेश गोफणे, दत्ता कुऱ्हाडे, महेंद्र कबीर, विपुल येलमर, लाखन जंगम, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वाळुंज, दिनेश कुऱ्हाडे, अतुल चौगुले, सचिन देवकर, किसन चौगुले, दिलीप चौगुले, पंकज चौगुले, जयेश जंगम, आकाश देवकर, ऍडव्होकेट रवींद्र नायकोडी यांचेसह आदी ग्रामस्थ मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्तीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे