शिरोलीत वॉटर फिल्टरचे उद्घाटन; शेकडो विद्यार्थांना मिळणार शुद्ध पाणी
1 min read
शिरोली दि.२:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल शिरोली सुलतानपूर (ता.जुन्नर) या विद्यालयाला मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती भास्कर खिलारी यांच्या दातृत्वातून “वॉटर फिल्टर ” प्रदान करण्यात आला. माजी सरपंच जयसिंग गुंजाळ व उद्योगपती भास्कर खिलारी या दोघांच्या हस्ते “वॉटर फिल्टर ” चे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच प्रिया खिलारी, उपसरपंच दत्तात्रय डावखर, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, उद्योगपती संतोष सातपुते पाटील, नंदू डावखर, किशोर मुळे, संजू डावखर, शरद मुळे, सुनील कुलकर्णी, दत्तात्रय सातपुते, शिवराम गुंजाळ, भानुदास सातपुते, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सुभाष खिलारी, माजी अध्यक्ष राजू पोळ, अजित खिलारी,
मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे, विद्यालयातील सर्व स्टाफ, असंख्य पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अशातच आजची दैनंदिन व धकाधकीची जीवनशैली व अशुद्ध पाणी यामुळे विविध आजारांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम बोऱ्हाडे यांनी पाण्याचे महत्त्व व काळाची गरज ओळखून सातत्याने खिलारी यांच्याकडे पाठपुरावा केला. टिकाऊ तसेच तुमच्या पसंतीचा वॉटर फिल्टर विद्यालयात तात्काळ बसवा. असे खिलारी यांनी म्हणत वॉटर फिल्टर ला मंजुरी देऊन ही योजना विद्यालयात तत्परतेने कार्यान्वित केली.
याही अगोदर विद्यालयाला खिलारी यांनी दर्जेदार इन्वर्टर संच भेट दिलेला आहे. या दोन्ही संचाचे आज घडीला बाजारात मूल्य एक लाख रुपये आहे.आज खऱ्या अर्थाने न्यू इंग्लिश स्कूल शिरोली सुलतानपूर बोरी या विद्यालयात २६ जानेवारी ला मिळालेल्या अनोखी भेटीने सर्व विद्यार्थी आनंदून गेलेले होते.
हे विद्यालय माझे आहे. ही भावना येथील सर्व जनतेची, ग्रामस्थांची तसेच पुणे व मुंबई येथील दानशूर उद्योगपतींची असल्यामुळे दिवसेंदिवस विद्यालयाची प्रगती होताना दिसत आहे.