रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व सी – क्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न

1 min read

आळेफाटा दि.३:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व सी – क्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कॅन्सर समज, गैरसमज, शंकांचे निरसन कॅन्सर सर्जन डॉक्टर अमोल डुंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन च्या कार्याची माहिती रोटरीयन अमोल कापसे यांनी दिली.ज्येष्ठ रोट्रियन मोहन भुजबळ पाटील यांनी उपस्थित लोकांना आरोग्य आणि कॅन्सर विषयी बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी कॅन्सर रुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन कॅन्सर झाल्यास घाबरू नका, लढा द्या, आजार लपवू नका असे आव्हान केले. उपस्थित सर्वांचे आभार रोटरीयन राजेंद्र जाधव यांनी मानले. कॅन्सर ही भारतात मोठी समस्या बनत चालली असून 2020 च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 15 लाख लोकांना कॅन्सर होतो. तर त्यातील 50 टक्के लोकांचा कॅन्सर मुळे मृत्यू होतो. त्यामुळे वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचे मत डॉक्टर अमोल डुंबरे यांनी यावेळी मांडले. यावेळी रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कवी संदिप वाघोले व शिवाजी गोरे यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे