महाराष्ट्रात चोरी करणारी परराज्यातील टोळी आळेफाटा पोलीसांनी केली जेरबंद; १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

1 min read

आळेफाटा दि.२:- गुजरात गोध्रा हत्याकांडातील जन्मपेठ झालेला आरोपी पॅरोल रजेवर फरार होवून महाराष्ट्र राज्यात चोरी करणारी परराज्यातील टोळी आळेफाटा पोलीसांनी केली जेरबंद.याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.७ जानेवारी रोजी पहाटे च्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे आतील मोकळे जागेत सोमनाथ नारायण गायकवाड वय ३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा. करकंब ता. पंढरपुर जि. सोलापुर हा त्याच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो कमांक एम.एच.०५ डी.के.७६३३ यामध्ये भिवंडी येथील जे के टायर्स अॅन्ड इंडस्ट्रील लि. शक्ती लॉजीस्टीक पार्क भिवंडी महाराष्ट्र कंपनीचे गोडावून मधून १६५ टायर घेवून सोलापुर येथे जात असताना रस्त्याने झोप आल्याने फिर्यादीने गाडी रस्त्याचे कडेला लावून झोपी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील टी एल मॉडेलचे प्लॅक्स लहान टायर १८ व टी एल मॉडेलचे मोठे टायर लंगोट व टयुब असे २२ नग एकुण २,४९,६२२/- रू किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेबाबताची फिर्याद सोमनाथ गायकवाड यांनी दिली होती.या गुन्हयाचा तपास करीत असताना आळेफाटा पोलिसांना मंचर पोलीस स्टेशन व सिन्नर पोलीस स्टेशन, नाशिक येथे ढाबे व पेट्रोलपंप भागात थांबणाऱ्या गाड्यांची पाठीमागील बाजुने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेलेबाबत अशाचप्रकारचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे नमुद गुन्हयांची गुन्हा करण्याची पध्दत ही एकाच प्रकारची असल्याने सदर गुन्हयांचा अभ्यास करून अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोध्रा या ठिकाणची असल्याची गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सदर संशयीतांचे मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आयशर टेम्पो क्रमांक जि.जे.१४ एक्स ८८५३ याच्या सहाय्याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सदर आयशर टेम्पोचा शोध घेवून सदरचा आयशर टेम्पो चांदवड जि. नाशिक येथून आरोपी १) सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा वय ५५ वर्षे, २) साहील हनीफ पठाण वय २१ वर्षे, ३) सुफीयान सिकंदर चॅदकी वय २३ वर्षे, ४) आयुब इसाग सुनठीया वय २९ वर्षे, ५) इरफान अब्दुलहामीद दुरवेश वय ४१ वर्षे रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल राज्य गुजरात यांच्यासह ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता.

या आरोपींनी आळेफाटा, मंचर तसेच सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडुन त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला आयशर टेम्पो तसेच गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल असा एकुण १४,४०,८७८ रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा वय ५५ वर्षे हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्यांस नमुद गुन्हयात आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून सदर कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असताना ०८ वेळेस पॅरोल रजेवर असताना तो परत कारागृहात हजर न होता. टोळी बनवून चोरीचे गुन्हे करत असून त्याच्यावर पुणे, नाशिक, गुजरात, राजस्थान या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो.हवा विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, पो.कॉ. अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे