बैलांना उसाने अमानुष मारहाण पडली महागात; बारीकराव गर्जे वर गुन्हा दाखल

1 min read

पुणे दि.३:- बैलगाडीमधून ऊस कारखान्यावर ऊस घेऊन जात असताना बैलांना उसाने अमानुष मारहाण करणे वृद्धाला चांगलेच महागात पडले. या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी (दि.१) शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी हर्षवर्धन शिवकुमार चौधरी (वय ३५, रा. कोथरूड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारीकराव धोंडिबा गर्जे (वय ६५, रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अंदाजे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हि घटना घडली. गर्जे हे कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर बैलगाडी मधून ऊस वाहतूक करतात. ते ऊस वाहतूक करत असताना त्यांनी बैलांना उसाने अमानुष मारहाण केली. तसेच क्रूरतेने वागणूक दिली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे