शासकीय लोगो असणाऱ्या दोन स्कॉर्पिओसह ५३ किलो गांजा जप्त; सहा जणांना अटक
1 min read
शिक्रापूर दि.१:- शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले. शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी ५३ किलो गांजा जप्त करत पोलिसांनी वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.शिक्रापूर हद्दीमध्ये पुणे-नगर महामार्गावरून दोन पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती वाहनावर शासकीय लोगो शिक्रापूर पोलिसांनी जप्त केलेल्या.
एका स्कॉर्पिओ वाहनावर शासनाच्या गुणवत्ता हमी नियंत्रक व गुणवत्ता नियंत्रण विभागाचा लोगो असल्याचे आढळून आले. हा लोगो का लावला याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. हा लोगो प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी लावला असल्याचे बोलले जातेय.
पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, जयराज देवकर, रोहीदास पारखे यांनी कासारी फाटा जवळील आयुष पार्क जवळ सापळा लावला. त्यांना दोन पांढर्या रंगाच्या संशयित स्कॉर्पिओ (एमएच १४ एफएम २५५१ व एमएच १० डीयू ९३४५) भरधाव वेगाने आल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओ तपासणी केली असता दोन्हीमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. विचारपूस केली असता.
सर्वजण उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. यावेळी पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओसह त्यामध्ये असलेला ५३ किलो गांजा असा १९ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करत गांजा वाहतूक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले.