नळवणे येथे हळदी कुंकू समारंभानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी

1 min read

नळवणे दि.२:- डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत नळवणे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत “आस्था” कँसर पूर्व तपासणी व जनजागृती शिबिराचे व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जी तपासणी करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये पर्यंत खर्च येतो ती तपासणी डिसेंट फाउंडेशच्या वतीने पूर्णपणे मोफत केली जाते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षाताई गुंजाळ व डोके हॉस्पिटल चे डॉ.अमेय डोके यांनी महिलांना कॅन्सर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी तपासणी तज्ञ सपना बेलवटे यांनी २८ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी केली. यावेळी सरपंच अर्चना उबाळे यांनी मान्यवारांचे स्वागत केले. यावेळी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

जुन्नर तालुक्यातील सर्व महिलांची कॅन्सर पूर्व तपासणी करण्याचा डिसेंट फाउंडेशचा संकल्प असल्याचे जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरा बरोबर आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी सरपंच अर्चना उबाळे यांनी महिलांचे स्वागत केले. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे 150 महिला नवलेवाडी, सुरकुलवाडी, नळवणे गावठाण आणि गावातील वाडा वस्त्यांवर हळदी कुंकवाचा कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नळवणे या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, मदतनीस जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आणि बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विधवा महिलांना देखील बोलवण्यात आले होते. विद्या महिलांच्या संमतीने त्यांना हळदीकुंकू लावून तिळगुळ देऊन वाण लुटण्यात आले.

विधवा महिला ही हळदी कुंकू कार्यक्रमांत उपस्थित होत्या. सर्व महिला एकसमान आहेत असेच समजून प्रत्येक महिलेला एक समान न्याय आणि एक सारखा सन्मान झाला पाहिजे या हेतूने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांनी दिलेल्या.

प्रतिसादामुळे कार्यक्रम सार्थकी लागल्याचे समाधान वाटले असल्याचे सरपंच अर्चना उबाळे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला बोरी खुर्द (साळवाडी) गावच्या सरपंच कल्पना काळे सह उद्योजक वैभव काळे देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे