अर्थसंकल्प शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय निराशा जनक:- प्रमोद खांडगे पाटील

1 min read

जुन्नर दि.२:- अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय निराशा जनक आहे. पोकळ घोषणा मोठमोठ्या वल्गना रासायनिक खतांच्या वाढत्या किमती त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतांच्या सबसिडी मध्येवाढ करण्याचा निर्णय दिसत नाही.त्याचबरोबर साखर उद्योग अन्नप्रक्रिया उद्योग असेल यासाठी विशेष सवलती काही नाही. उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यावर नियंत्रण म्हणून उपाययोजना काही नाही. डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गना केली जाते परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगी दिली जाते. मग या धोरणाचा उपयोग कायडाळ तेल बिया या बाबतीत आत्मदिन निर्भर करायचे असेल तर हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे. कारण जोपर्यंत शेतकऱ्याला हमखास गॅरेंटेड एवढे पैसे मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाहीडाळ पिके असतील सोयाबीन हरभरा तूर असेल किंवा वाटाणा असेल. यातून हमखास बाजारभाव मिळेल याची खात्री होत नाही तोपर्यंत डाळ वर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही साखर उद्योगात काहीच तरतूद केलेली नाही. एका बाजूला इथेनॉल बाबतीत वाढ करण्याच्या संकल्प करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकार इथेनॉलच्या किमती सरकार वाढू देत नाही. दुधाला बाजार नसल्यामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेला आहे. त्याबाबतीत देखील अर्थसंकल्पात तरतूद नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे