साई संस्कार क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

1 min read

बेल्हे दि.२:- बेल्हे येथील नामांकित क्लासेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साई संस्कार शैक्षणिक संकुल येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारच्या गमतीदार स्पर्धांचे आयोजन करून या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी तणावमुक्त करण्यात आले.यावेळी बोलताना साईसंस्कार शैक्षणिक संकुलाचे संस्थापक संचालक अमर डुकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व भविष्यात कोणत्याही शाखेतील प्रवेशा संदर्भात कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. अकरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शैक्षणिक संकुलात सुरुवातीला तीनच विद्यार्थी असताना आज एकूण अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासाला अमर डुकरे यांनी उजाळा देत याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी या संकुलावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी कायम तत्पर असल्याचे नमूद करत कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याबद्दल अकरावीच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.या संकुलाच्या डायरेक्टर अनुजा डुकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून आपल्या संकुलाचे व आई-वडिलांचे नाव मोठे करून आपले भविष्य उज्वल करावे असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विविध गमतीदार स्पर्धा घेण्यासाठी रेणुका गुंजाळ, वैष्णवी गाडगे, अश्विनी कापरे, विद्या अवचर, तनुजा भांबेरे, खुशाली पवार, प्रथमेश गाडगे, साई गुंजाळ या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी गलांडे हिने केले. सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल संकुलाच्या कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे