पीक कर्जाची वसुली तात्काळ बंद करावी नाहीतर निदर्शने करण्यात येतील:- प्रमोद खांडगे पाटील
1 min read
जुन्नर दि.१:- श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव (ता. आंबेगाव जि.पुणे) श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवृत्तीनगर धालेवाडी ता.जुन्नर जि.पुणे या कारखान्याच्या ऊस बिलामधून शेतकऱ्यांची पीक कर्जाची वसुली आपण पूर्व सूचना न देता सुरू केली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांचे थकीत पिक कर्जाची वसुली बँकेने कारखान्यांमार्फत सुरू केली. आहे. हे अत्यंत चुकीचे, शेतकऱ्यांवर अन्याय करणारी वसुली आपल्या बँकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. सरकार स्थापनेच्या आधी वचन नाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा वचननामा राज्य सरकारने दिला होता परंतु इलेक्शन झाल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापण्याचा काम सुरू केले आहे.
तुटपुंज ऊस बिलातून संपूर्ण कर्ज वसुली आपल्या बँकेमार्फत सुरू करण्यात आलेली आहे अजून मार्च एंड ला टाइम असताना देखील अशा प्रकारची पठाणी वसुली आपल्या बँकेमार्फत होत आहे. कुठल्याही शेतीमालाला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकोटीला आला असताना.
ऊस हाच शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा आधार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न व इतर उदरनिर्वाहासाठी ऊस बिलाचा आधार असतो अशाप्रकारे वसुली करण्यात अत्यंत चुकीचा आहे. ही वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा आपल्या बँकेसमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने/ठिया आंदोलन करण्यात येतील.
याची नोंद घ्यावी व तात्काळ वसुली बंद करावी असे निवेदन प्रमोद खांडगे पाटील अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना पुणे यांनी विभागीय अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक विभाग जुन्नर यांना दिले आहे.