साईसंस्कार शैक्षणिक संकुलात हळदी कुंकू समारंभ
1 min read
बेल्हे दि.१:- साईसंस्कार शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या संकुलाच्या बेल्हे येथील शाखेमध्ये संचालिका अनुजा डुकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालक माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.या सर्वांचे शैक्षणिक संकुलाच्या डायरेक्टर अनुजा डुकरे व कॅम्पस डायरेक्टर सपना शिंदे यांनी स्वागत करून सर्वांना तिळगुळाचे वाटप व भेटवस्तूचे वाण प्रदान करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता पालकांशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्व विकास घडवून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करण्यात अशा उपक्रमाची भर पडत असल्याने या उपक्रमाचे या संकुलाचे संस्थापक संचालक अमर डुकरे यांनी भरभरून कौतुक केले व उपस्थित सर्व माता भगिनिंचे आभार मानले.