रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांच्या वतीने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिर

1 min read

आळेफाटा दि.१:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन आणि सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले आहे. यामध्ये कॅन्सर समज गैरसमज व शंका वरती निरसन केले जाणार आहे. डॉक्टर अमोल डुंबरे कॅन्सर सर्जन हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार असून सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा (ता.जुन्नर) येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मोफत नाव नोंदणी व शंका निरसनासाठी 8411014040 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जुन्नर तालक्यातील कर्करोग रुग्णांचे वाढते प्रमाण ही अतिशय धक्कादायक व चिंतेची बाब असून खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका१) शरीरावर कोणत्याही भागात असलेली न दुखणारी गाठ २) तोंडामधील न भरणारी जखम ३) अन्न गिळताना होणार त्रास किंवा वेदना ४) न थांबणारा खोकला ५) आवाज घोगरा होणे.

६) खोकताना, गुदद्वारातून, योनीमार्गातून किंवा लघवीवाटे होणारा अनियमित रक्तस्त्राव ७) कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे ८) सतत अपचन किंवा पोट साफ न होणे ९) स्त्रियांच्या स्तनांमध्ये किंवा काखेमध्ये असणारी न दुखाणारी गाठ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे