आळेफाटा बसस्थानकात नवनाथ वाळुंज यांचे अन्नत्याग उपोषण
1 min read
आळेफाटा दि.३१:- आळेफाटा बसस्थानकातील दुकाने तातपुरत्या स्वरुपात इतर ठिकाणी हलवून व अतिक्रमणे काढून संपुर्ण बसस्थानकाचे काँक्रेटिकरणाचे उत्कृष्ट व दर्जेदार काम करण्यासाठी अनेकदा पत्र व्यवहार व विनंती करून देखील, कामाकडे दुलर्क्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नवनाथ दादाभाऊ वाळुंज हे येथील बसस्थाणकात अन्नत्याग उपोषणास बसले आहेत.याबाबत वाळुंज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एमआयडीसीच्या माध्यमातून येथील बस स्थानकाच्या कॉक्रीटीकरणासाठी जवळपास एक कोटीचा निधी उपलब्ध झाला असुन येथील बस स्थानकाचे काम अपूर्ण असताना बस स्थानक वापरासाठी खुले करण्यात आलेले आहे.
येथील बस स्थानकातील अतिक्रमणे काढून स्थानकातील दुकाने तात्पुरत्या स्वरूपात इतर ठिकाणी हलवून या जागेचे मोजणीकरून संपुर्ण काम होईपर्यंत स्थानक ठेवावे अशा विविध मागण्यांसाठी उपोषण बसलो असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत अविनाश चौगुले, सचिन देवकर, ग्रा.सदस्य संतोष पादीर,
ग्रा. सदस्या निशा वाळुंज, कांचन अंतुले, प्रशांत देवकर, किसन चौगुले, पंकज चौगुले, गणेश गोफणे, विपुल येलमर, अजित जठार, सुदर्शन मंडले, संतोष शिंदे, दिलीप चौगुले, अजित नलावडे, दिनेश कुऱ्हाडे, अतुल चौगुले, राम पाटील चौगुले, अशोक कुटे, सीताराम वाळुंज, आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.