पाण्याच्या स्टोरेज मध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने दिले जीवदान
1 min read
ओतूर दि.३१:- ओतूर मधील पानसरेवाडी येथील पाण्याच्या स्टोरेज मध्ये बिबट मादी अंदाजे वय वर्ष तीन महिने अडकली असल्याचे उपसरपंच प्रशांत डुंबरे यांचे भ्रमणध्वनीवरून समजले असता तात्काळ सारिका बुट्टे वनपाल ओतूर, विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर, दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर, कैलास भालेराव वनरक्षक आळे, तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, फुलचंद खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची खात्री केली. तद्नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांना भ्रणध्वनी वरून माहिती दिली असता लहू ठोकळ हे देखील घटनास्थळी तात्काळ पोहोचून
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी तसेच आळे रेस्कु टीम व ग्रामस्थ यांचे मदतीने पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट मादीस योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले.