व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न
1 min read
नगदवाडी- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर, शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी इ. उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रमुख पाहुणे लक्ष्मण गुंजाळ (वि.जु.से.मंडळ, ज्येष्ठ सभासद) यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजाला सलामी देत असताना उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन देशाप्रति आदर व्यक्त केला. मान्यवरांच्या उपस्थितीत – परेडचे शिस्तबद्ध प्रात्यक्षिक- विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी प्रमुख मान्यवरांसमवेत रिटायर्ड लेफ्टनंट जनरल उमेश अवचट, माजी अध्यक्ष अशोक सोनवणे तसेच गोविंद बढे, मंगल शिवाजी बांगर हे देखील मान्यवर उपस्थित होते.
तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या समवेत सेक्रेटरी विजय पारखे, खजिनदार शिवाजी बांगर, सहसचिव संपत काने, विश्वस्त- विक्रांत काळे, विश्वस्त- चंद्रकांत सोनवणे, विश्वस्त- वसंत पाडेकर, सल्लागार संतोष पारखे हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पालक शिक्षक संघाचे किशोर काकडे तसेच पालक- शिक्षक संघातील सन्मा. सदस्य व विद्यार्थ्यांचे पालक ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इ.6 वी व 7 वी मधील विद्यार्थिनींनी गायलेल्या सुमधुर स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. हे स्वागतगीत देशभक्तीचा अभिमान जागवणारे होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच रायफल शुटिंग, कराटे या स्पर्धे मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. रायफल शुटिंग, कराटे प्रात्यक्षिके, पिरॅमिड रचना, स्केटिंग आणि देशभक्तीपर नृत्य ही सर्व सादरीकरणे
विद्यार्थ्यांच्या कलेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट अविष्कार होता. काही निवडक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांमधून प्रजासत्ताक दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनीषा हांडे व किरण मुळे या शिक्षकांनी केले. विनायक वऱ्हाडी व महेंद्र गुळवे तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थ्यांनी विविध लक्षवेधक प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची आकर्षकता वाढवली तसेच शाळेतील कलाशिक्षक रोशन बनकर यांनी भारत देशाचा सन्मान वाढवण्यासाठी प्रतीकात्मक भारताचा नकाशा व सजावट उत्कृष्ट पद्धतीने करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेच्या पहिल्या मजल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांच्या हस्तकलेचा व कौशल्याचा मागोवा घेणारे ‘आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शन’भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रकलेच्या नमुन्यांपासून हस्तकलेतील विविध कलाकुसरी पर्यंत सर्व प्रकारच्या कलाकृतींचा समावेश होता. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे होते की, यामध्ये (Best from waste) ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तु तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक शिक्षकांचेही विशेष योगदान व कष्ट दिसून आले.
पालक आणि उपस्थित मान्यवरांनी या प्रदर्शनाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. शिक्षिका प्रतिभा टेमगिरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी पालकांचीही विशेष उपस्थिती लाभली. शाळेच्या समन्वयिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे कलेतील योगदान आणि उपक्रम पाहून पालक व मान्यवर आनंदित झाले. या सोहळ्याने शाळेचा शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला हे नक्की.