सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात कवायतीतून राष्ट्रध्वजाला सलामी
1 min read
राजुरी दि.२८:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे संचालक नागेश अस्पात याच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी मुलांनी विविध कवायती सादर करून ध्वजाला सलामी दिली.
आणि अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती, देशाभिमानाविषयी भाषणे केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण कलाविष्कार सादर केले. तद्प्रसंगी प्रजासत्ताक दिनाचे महत्व, देशसेवेचे महत्व सांगून स्वतंत्र भारताने राज्यघटना स्वीकारून ७५ वर्ष पूर्ण झाले त्यामुळे संविधानाचा अमृत मोहत्सव चालू आसताना. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित केले पाहिजे आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं पाहिजे असे आव्हान नागेश आस्पात यांनी केले. इंजिनीयर हे उत्पादक असतात. समाजासाठी प्रोडक्शन निर्माण करतात आणि समाजासाठी कार्य करतात. समर्पण भावना फर्टीलीटी, न्याय, समानता, आदि विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती चेरमन व्ही. आर. दिवाकरण, उपाध्यक्ष किशोर पटेल, सेक्रेटरी गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक नागेश आस्पात, डॉ. के.आर. भानुशाली, स्कूलच्या वर्षा भालेराव, उपप्राचार्य पी. बालरामडू, मुख्याध्यापक सचिन डेरे आदि मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया वाघोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संयोजकांनी परिश्रम घेतले.