दावडीत भरला विद्यार्थ्यांचा प्लास्टिक मुक्त आनंद बाजार
1 min read
दावडी दि.२७:- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यालयातील पाचवी ते बारावीचे विद्यार्थी आनंद बाजार उपक्रमात सहभागी झाले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजीपाला,
गृहपयोगी वस्तू चे स्टॉल लावत खरेदी-विक्रीचा आनंद घेतला विद्यालयाचे प्राचार्य दादाभाऊ फापाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्लास्टिक मुक्त आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी व त्यांची व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य दादाभाऊ फापाळे यांनी सांगितले. सदर आनंद बाजारामध्ये तब्बल सात हजार रुपयांची उलाढाल झाली.
विद्यार्थ्यांनी भाजीपाला देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला नाही तर शिक्षकांनी व ग्राहकांनी सदर भाजीपाला घेण्यासाठी कापडी पिशव्या वापरल्या. कार्यक्रमाच्या निमित्त विद्यालयाचे पर्यवेक्षक सतिश राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.