प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लवणवाडी शाळेत बाल आनंद मेळावा

1 min read

आळे दि.२७:- प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लवणवाडी (ता.जुन्नर) येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध वेशभूषा आणि कार्यक्रम सादर करण्यात आले.या बाल आनंद मेळाव्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह समस्त ग्रामस्थ आळे, लवणवाडी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकारी सोसायटीचे सदस्य आणि इतर मान्यवर नेहमीच उपस्थित राहतात. कार्यक्रमामध्ये मुलांना बक्षिसांद्वारे खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक बाळासाहेब हांडे (माऊली मोटर्स, आळेफाटा) यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे, शिक्षिका वर्षाराणी मटाले आणि दिपाली बेलेकर यांचे विशेष सहकार्यही महत्वाचे ठरले.दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित हा बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, शिक्षण आणि एकात्मतेचे महत्त्व समजावून देतो, तसेच समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या सहकार्यामुळे शालेय जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण होतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे