सरपंच किशोर घोडे यांच्या हस्ते दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात ध्वजारोहण

1 min read

निमगाव सावा दि.२६:-श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सुरुवातीला संविधानाच्या सरनामा (उद्देशिका ) सामूहिक वाचन करण्यात आले. नंतर ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थीनी साक्षी गाडगे, रुबीना मणियार यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिनाचे महत्व, इतिहास आणि आपले कर्तव्य याविषयीं मार्गदर्शन केले. यावेळी पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते डॉक्टर विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड टीच युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे येथील एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ.प्रतीक्षा खोरपडे, डॉ.रूपाली सोनालीकर या प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले. डॉ विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड टीचर युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी समाज प्रबोधन पर पथनाट्य सादर केले.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, संस्थेचे सचिव परेश घोडे, रवी शेगर, स्वप्नील थोरात, सुभाष मिटकरी, कविता पवार, बाळासाहेब गाडगे, प्रतीक घोडे, अक्षय घोडे, ज्ञानेश्वर पवार, निवृत्ती पवार, रुपेश गाडगे, संजय गाडगे, आकाश खाडे, शुभम बोराडे, सिद्धेश घोडे, डॉ. आनंद कुलकर्णी,डॉ. प्रतीक्षा घोरपडे, डॉ.रूपाली सोनालीकर, मयूर डुकरे, माजी विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे