मॉडर्नमध्ये प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांची रेलचेल
1 min read
बेल्हे दि.२६:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रविवार दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये सकाळी ८.२५ वा. ध्वजारोहण संस्थेचे विश्वस्त दावला कणसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गायन, ध्वज गीत, राज्यगीत, संचलन, देशभक्तीपर नृत्य, मानवी मनोरे, क्रांतिकारक व महापुरुषांच्या वेशभूषासह जीवनावर भाषणाच्या माध्यमातून माहिती सादर करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात चित्र कला स्पर्धा निबंध स्पर्धा, हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शाळेत आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी महिलांना करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर
कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या घाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग यांसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.