दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
1 min read
निमगाव सावा दि.२५:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली. सुभाष घोडे यांनी प्रास्ताविक करताना आजचा दिवस मतदार दिवस म्हणून का साजरा केला जातो. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच आपण सर्वांनी मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे. मतदान करणे.
हे आपले सर्वांचे कर्तव्य असून मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. भारतामध्ये मतदानाबाबत काही प्रमाणात उदासीनता दिसून येते. परंतु आपण सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण मतदारांनी याबाबत जनजागृती करून जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड टीच युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी, प्रा. डॉ.प्रतीक्षा खोरपडे, प्रा.डॉ. रूपाली सोनालीकर तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी
आणि महाविद्यालयीन तसेच डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड टीचर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड केले आणि प्रा. अनिल पडवळ यांनी आभार मानले.