सह्याद्री व्हॅली च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वडगाव कांदळी गाव केले चकाचक; पथनाट्यातून दिला महिला सुरक्षा व व्यसनमुक्तीचा संदेश

1 min read

वडगाव कांदळी दि.२४:- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी

यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजीटल लिटरसी’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाले. यावेळी शिबिरार्थींनी योगा, प्राणायाम, प्रार्थना, ग्रामस्वच्छता, नेत्र तपासणी, वृक्षारोपण केले. तसेच स्मशानभूमी, दशक्रिया विधीघाट, बिरोबा महाराज मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, ग्रामपंचायत कांदळी परिसर, गावातील रस्ते, नारायण गड संवर्धन गड स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांनी पार पाडली. व या ठिकाणी विद्यार्थ्यांनी श्रमदान केले गावच्या विकासात तरुणांचे योगदान, निर्भया जनजागृती, महिला सुरक्षा, राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे योगदान डिजिटल साक्षरता जैवविविधता संवर्धन,

या विषयावर व्याख्याने झाली. महिला सुरक्षा व व्यसनमुक्ती या विषयावर विद्यार्थ्यांनी पथ नाट्यातून सामाजिक प्रबोधन केले.या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांची मार्गदर्शन आणि प्रोत्साहनपर भाषणे झाली. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले तुम्ही उद्याचे देशाचे भविष्य आहात. या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रभावना बंधुभावना जागृत करून एकमेकाविषयी प्रेम पूर्वक वागावे आणि देशासाठी आदर्शवत काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत फुलसुंदर यांनी स्वयंसेवकांना प्रमुख अतिथी म्हणून संबोधित केले. राष्ट्रिय स्वयंसेवक घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे महत्त्वाची भूमिका पार पडतात असे ते म्हणाले.वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रमदानाचे कौतुक केले व त्यांना त्यांच्या महाविद्यालयीन काळ आठवला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्कृष्ट असे काम गावामध्ये केल्याबद्दल प्रत्येक स्वयंसेवकाचा त्यांनी ट्रॉफी व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानही केला.शिबिराच्या समारोप प्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पी आय महादेव शेलार, आळेफाटा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल पन्हाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, उपप्राचार्य पी. बलराम, प्रा. श्रीकांत पाचपुते वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्का पाचपुते,

उपसरपंच संजय खेडकर, माजी सरपंच शरद पाचपुते व ग्राम पंचायत सदस्य, विविध पतसंस्था चेरमन, ग्रामसेवक व कर्मचारी व अन्य ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. उद्धव भारती यांनी शिबिर कामकाज अहवाल वाचन केले

तर अंकिता कुंभार, निकिता पावडे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले व आभार अलंकार कालेकर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे