रानमळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
1 min read
रानमळा दि.२३:- रानमळा (ता. जुन्नर) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीरार्थी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी रानमळा गाव आणि ग्रामपंचायत परिसरामध्ये सोनचाफा, फणस, आवळा, आंबा आणि विविध वनऔषधी झाडांसाठी खड्डे घेऊन त्यामध्ये शेणखत व माती टाकून वृक्षांचे रोपण केले.श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर रानमळा येथे पार पडत आहे. या शिबिरामध्ये शिबिरार्थी स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता, परिसर स्वच्छता, आरोग्य तपासणी, सर्वेक्षण यासारखे उपक्रम राबविले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड व प्रा.प्रवीण गोरडे यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण केले. याप्रसंगी श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदाम जगताप, रानमळा गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता तिकोणे, उपसरपंच शोभा जाधव, पल्लवी तिकोणे उपस्थित होते.
माजी सरपंच सुरेश तिकोने, ग्रामपंचायत सदस्य कैलास गुंजाळ, संतोष गुंजाळ, मनीषा गुंजाळ, इंदुबाई गुंजाळ, श्वेता गुंजाळ, दत्तात्रय दरेकर तसेच ग्रामसेविका आशा शेडाळे, विलास गुंजाळ, नरेश पवार, माजी विद्यार्थी मयूर डुकरे, जितेंद्र डुकरे या सर्वांचे यासाठी सहकार्य लाभले.
तसेच महाविद्यालयातील प्रा.अनिल पडवळ,प्रा. माधुरी भोर, प्रा.अजय ननवरे आणि शिबिरार्थी स्वयंसेवकांनी वृक्षारोपणामध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी रानमळा ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले.