मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिप राज्यस्तरीय अजिंक्यपद मध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा झळाळता यशाचा ठसा
1 min read
मुंबई दि.२१:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित नगदवाडी येथील व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025, राज्यस्तरीय अजिंक्यपद या स्पर्धेत शानदार कामगिरी करून शाळेचे व समाजाचे नाव उंचावले आहे.स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे: आरोही रोहित काकडे (१० वर्षे, इयत्ता 5 वी) – सुवर्णपदक विजेती, आर्यन प्रवीण कालेकर (९ वर्षे, इयत्ता 3 री) – सुवर्णपदक विजेता, शौर्य किशोर काकडे (१० वर्षे, इयत्ता 5 वी) – सुवर्णपदक विजेता विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, उत्कृष्ट शिस्त, एकाग्रता, व प्रबळ जिद्दीच्या जोरावर आपल्या खेळ कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.
शाळेच्या कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा यामुळे विद्यार्थ्यांना या यशामध्ये मोलाची मदत झाली आहे.या चमकदार यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.
तसेच, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व शाळेचे सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीने शाळेचे नाव राज्यस्तरावर चमकवले आहे. या यशामुळे व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा नावलौकिक वाढवला असून, या विद्यार्थ्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.