शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेड परीक्षेत बेल्हेश्वर विद्यामंदिराचे उत्तुंग यश

1 min read

बेल्हे दि.२१:- महाराष्ट्र शासन कला संचानालय, मुंबई यांच्या मार्फत माहे सप्टेंबर२०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शासकीय रेखाकला चित्रकला ग्रेड परीक्षेत श्री बेल्हेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले असून एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही ग्रेड परीक्षांचा निकाल १००% लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य अजीत अभंग यांंनी दिली.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत एकूण ९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यातील १ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ६७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील ३७ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली तर २७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे:- प्रतीक नितीन वाघ, ऋतुजा सचिन बनकर, वैष्णवी चंद्रकांत शिंदे, स्नेहल निलेश भालेराव, निवेदिता नितीन मुळूक.गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मुख्याध्यापक अजीत अभंग म्हणाले, “ शासकीय रेखाकला परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वाढीव सवलतीचे गुण प्राप्त होतात. या योजनेचा विद्यार्थ्यांनी जरुर लाभ घ्यावा; मात्र केवळ परीक्षेतील गुणांपुरती आपली कला मर्यादित न ठेवता. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेत पारंंगत होऊन भविष्यात कला क्षेत्रात उत्तुंग यश मिळवावे” कला क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांचेही शाळेच्या विकासात योगदान असावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यशस्वी विद्यार्थ्यांना कला विभाग प्रमुख सुनील गटकळ व ज्येष्ठ कला शिक्षक प्रताप चिंतामणी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्याकडून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे