मॉडर्न स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात भक्त पुंडलिकांच्या जीवनपटातून समाज प्रबोधन

1 min read

बेल्हे दि.२०:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) चे २० वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये सायबर क्राईम, भक्त पुंडलिक यांचा जीवनपट दाखवणारे नाटक अशा नाटकांतून समाज प्रबोधन करण्यात आले. तसेच बाल चिमुकल्यांनी धार्मिक, पारंपारिक, देश भक्तीपर व आधुनिक प्रकारची नृत्य सादर केले. विद्यार्थांना उत्तुंग शिखरावर नेण्यासाठी अतोनात कष्ट करणाऱ्या शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे व संस्थापक सीए सावकार गुंजाळ यांचा अळकुटी गावच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वर्षी चा ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ रामदास सांगळे यांना देण्यात आला. इन्स्पायरिंग एज्युकेटर अवार्ड शाळेचे उपप्राचार्य के.पी सिंग यांना मिळाला. नववी ची विद्यार्थिनी रिया हाडवळे हिला ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर अवार्ड मिळाला. तर ‘बेस्ट आर्ट परफॉर्म’ हार्दिक भूयाळ, बेस्ट गर्ल परफॉर्मर ईश्वरी डोमे, बेस्ट बॉय परफॉर्मर वेदांश पानसरे,’स्टार किड’ अवार्ड सिनियर केजी चा विद्यार्थी संचित बोरचटे याला मिळाला.स्टार सिंगर आराधना काकड,बेस्ट स्पोर्ट पर्सन हेमाली दळवी, एक्सलेंस इन कंडक्ट अवॉर्ड प्रतीक्षा बांगर, बेस्ट हॉस्टेल बॉय कीर्तन धोडी, बेस्ट हॉस्टेल गर्ल विश्रुती मेढा हिला मिळाला.या वेळी २०२३-२४ वर्षात इयत्ता दहावी तसेच बारावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.तसेच विद्यालयाने सुरू केलेल्या मॉडर्न या वार्षिकाचे व मॉडर्न कॅलेंडर चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पालक भाऊसाहेब भांबेरे यांनी दहावीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला ५ हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले तसेच संस्थेचे संचालक भास्कर गाडगे यांनी गणित विषयात ९५ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.यावेळी मेजर रमेश खरमाळे, जीएमआरटी चे सायंटिस्ट व रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे सदस्य हनुमंत भंडारी, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जुन्नर पंचायत समिती माजी सदस्या अनघा घोडके, बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ,चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, संस्थेचे संचालक भास्कर पवार, सुरेश सोनवणे, भानुदास हाडवळे, भास्कर गाडगे, विश्वस्त दावला कणसे, ज्येष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे, प्राचार्या विद्या गाडगे, शिवसेना तालुका उपप्रमुख मोहन बांगर, बेल्हे गावचे उपसरपंच निलेश कणसे, गुळंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू गुंजाळ, शिक्षक, विद्यार्थी, बेल्हे ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य दिग्दर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे