लवणवाडी जिल्हा परिषद शाळेत बाजारात चिमुकल्यांची १५ हजारांची उलाढाल

1 min read

आळे दि.२०:- लवणवाडी आळे (ता जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कौशल्य आत्मसात व्हावे, व्यवहारीक ज्ञान येणे, त्यातुन त्यांचे सामाजिक सांभाषण ज्ञान वाढावे म्हणून आठवडे बाजार भरविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपादार्थ, पालेभाज्या, फळभाज्या, ओली भेळ, इडली सांबर असे विविध पदार्थ बाजारात विक्रीसाठी विद्यार्थांनी आणले होते. या बाजारासाठी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १ ली ते ४ थी चे विद्यार्थी व अंगणवाडीतील बालचमूंनी सहभाग घेतला.सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरव कोकणे, सदस्य, पालक, ग्रामस्थांसह मुख्याध्यापिका वर्षारानी मटाले व सहशिक्षिका दीपाली बेल्हेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमातील लहानग्यांचा उत्साह पाहून २६ जानेवारीला होणाऱ्या मुलांच्या कार्यक्रमासाठी तरुण वर्ग साई गुंजाळ, वैभव हुलवले मित्र परिवार यांनी मुलांना खाऊ वाटप करणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे