सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक
1 min read
मुंबई दि.१९:- सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. मोहम्मद आलियान ऊर्फ बी. जे. असे हल्लेखोराचे नाव आहे. विजय दास असे नाव बदलून तो मुंबईत राहत होता. अशी माहिती मिळत आहे.त्याने सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तो मुंबईतील एका पबमध्ये काम करत होता. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील मेट्रो बांधकाम साइटजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली. विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही अटक केली.
झोन-६चे डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. या अटकेसाठी विविध विभागांमध्ये तब्बल 30 टीम तयार करण्यात आली होती. आरोपीचं नाव मोहम्मद अलियान असल्याचं सांगितलं जात आहे.
सुरुवातीला त्याने आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला रविवारी रात्री उशिरा ठाण्यातील हिरानंदानी भागातून अटक केली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी त्याला मुंबईला आणले असून खास पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दास उर्फ मोहम्मद अलियान आधी मुंबईतील एका पबमध्ये काम करीत होता. त्यानंतर तो ठाण्यातील एका बारमध्ये काम करू लागला. पोलिसांनी सैफ प्रकरणातील हल्लेखोर ठाण्यात लपल्याची सूचना मिळाली होती.
टीमने ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे सुरू असलेल्या मेट्रोच्या ठिकाणी छापा मारला. आरोपी येथील लेबर कॅम्पमध्ये लपला होता. तो सुरुवातीला ठाण्यात हिरानंदनी परिसरात काम करत होता. त्यामुळे त्याला या भागाची संपूर्ण माहिती होती. तो ठाण्यातील लेबर कॅम्पजवळील जंगलात लपून बसला होता.
विजय दासने यापूर्वी मुंबईतील एका पबमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजयला अटक केल्यानंतर आज पोलीस त्याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर करणार आहेत. या कारवाईनंतर आज सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत.